Pandharpur News | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरु | Sakal Media

2022-03-30 1

Pandharpur News | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरु | Sakal Media

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणींचं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पदस्पर्श दर्शन सुरु होतंय. मराठी नववर्षानिमित्तानं विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्यपूजा सुरु होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च, २०२० रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १६ नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुलं झालं पण तेव्हा फक्त मुखदर्शनाची मुभा देण्यात आली होती. पदस्पर्श दर्शन अजूनही बंद होतं. पण आता कोरोना संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्यानं भाविकांना, वारकऱ्यांना थेट विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी जाऊन दर्शन घेणं अपेक्षित होतं.

Videos similaires